पीएम्इंडिया
विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी सह इतर क्षेत्रात वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यासाठीच्या इंडियन नॅशनल सायन्स ॲकेडमी आणि नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेस ऑफ बेलारूस यांच्यातल्या कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या भारत भेटीदरम्यान, नवी दिल्लीत 12 सप्टेंबर 2017 रोजी या कराराची देवाणघेवाण झाली होती.
संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण,संयुक्त कार्यशाळा आणि परस्पर भेटी यातून दोन्ही देशातल्या संस्थांना याचा लाभ होणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha