Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि बेल्जियम दरम्यान ऊर्जा क्षेत्रासाठी सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि बेल्मियम दरम्यान संघीय आणि प्रादेशिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रासाठीच्या सामंजस्य कराराला मंजूरी देण्यात आली.

नव्या तसेच नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात उभय देशांना समानरित्या हितकारक ठरणारे सहकारी संस्थात्मक संबंध प्रस्थापित करणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य हेतू आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासावर सहकार्य करण्यावर या करारात भर राहील. या कराराअंतर्गत पवन ऊर्जा, सौर ऊर्जा (औष्णिक आणि फोटो व्हॉल्टिक), स्मार्ट ग्रीड, जैव औष्णिक ऊर्जा आणि सागरी ऊर्जा या क्षेत्रातील नव्या आणि नवीकरणीय ऊर्जेच्या विकासावर भर राहील. तसेच ऊर्जा पुरवठा आणि ऊर्जा सुरक्षेमध्ये नवीकरणीय ऊर्जेचे योगदान आणि परस्पर सहमतीच्या आधारावर इतर क्षेत्रातील सहकार्यावरही कार्य केले जाईल. या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत व्हायला मदत होईल.

J.Patnakar/S.Tupe