पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारत आणि ब्रिक्स समुहातील देशांबरोबर झालेल्या करविषयक सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. या समुहामध्ये ब्राझिल, रशिया, चीन, आणि दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा सहभाग आहे. करविषयक सामंजस्य कराराबरोबरच महसुलाच्या व्यवस्थापनामध्येही सहकार्य करण्यात येणार आहे.
उद्देश –
भविष्यामध्ये ब्रिक्स समुहातील देशांमध्ये कर आणि महसूल यांच्यासंबंधी अधिक चांगले सामंजस्य निर्माण करण्याचा उद्देश या करारामागे आहे. समुहातील देशांना रस असलेल्या समान क्षेत्रांमध्ये कर, महसुलाविषयी तज्ञांची चर्चा होवू शकणार आहे. त्याचबरोबर या करारामुळे काही गुप्त परंतु आवश्यक माहितीचे आदान-प्रदान होवू शकणार आहे.
प्रभाव –
या करारामुळे करविषयक प्रकरणांमध्ये प्रभावी सहकार्य समुहातील देशांना मिळणार आहे. याचा फायदा इतर विकसनशील देशांची प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या कर प्रकरणे सोडवण्यासाठी होवू शकणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/Anagha