पीएम्इंडिया
आरोग्य क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात जानेवारी 2014 मध्ये भारत आणि मालदिव यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्व कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
या सामंजस्य करारात पुढील बाबींसंदर्भातील सहकार्याचा समावेश आहे.
• डॉक्टर, अधिकारी, इतर आरोग्यविषयक व्यावसायिक आणि तज्ञ यांची देवाणघेवाण आणि प्रशिक्षण.
• मनुष्यबळ निर्मिती आणि आरोग्य देखरेख सुविधा उभारणीत सहकार्य.
• वैद्यकीय आणि आरोग्यविषयक संशोधन विकास
• आरोग्य देखभाल क्षेत्र आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन.
• जेनेरिक आणि जीवनावश्यक औषधांचा पुरवठा आणि औषध पुरवठ्यात सहकार्य
• आरोग्य प्रोत्साहन आणि रोग निवारण
• पारंपरिक आणि पूरक औषधे
• टेलीमेडीसीन
• द्विपक्षिय सहमतीनुसार निश्चित अन्य क्षेत्रातील सहकार्य
दोन्ही देशांमध्ये विशेषत: मालदिवमध्ये आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळ आणि सुविधांच्या विकासासाठी साहाय्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार सहकार्य वाढवणारा ठरेल. आरोग्य क्षेत्रातील वाढलेले सहकार्य, दोन्ही देशांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ करेल.