पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील पशु आरोग्य क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी अनुमती देण्यात आली.
या कराराअंतर्गत पशु आरोग्य क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे आणि खालील गोष्टींना मंजुरीही देण्यात आली आहे.
1. पशु आरोग्य क्षेत्रातील विशेष माहितीचे आदान-प्रदान आणि विशेष करून दोन्ही देशांमधील चिंताजनक पशु रोगाची लागण झालेल्या प्राण्यांना वेगळे ठेवणे, पशु रोगांसंबंधीची देखरेख आणि तपासाची प्रगती आणि खाद्यान्नातून निर्मित होणाऱ्या रोग जंतूबाबतच्या माहितीचे आदान प्रदान
1. मांसावरील प्रक्रिया, मांसाहारी उत्पादने आणि कत्तलखान्यांबाबतच्या विशेष माहितीचे आदान-प्रदान
2. पशु स्वच्छतेविषयक द्विपक्षीय करार आणि दोन्ही देशांदरम्यान सक्षम प्राधिकरणांद्वारे आरोग्य प्रमाणपत्र जारी करणे.
हा सामंजस्य करार 10 वर्षांसाठी लागू राहील.
J. Patankar/S.Tupe/N.Sapre