Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात सागरी वाहतूक क्षेत्रात संस्थात्मक सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात सागरी वाहतूक क्षेत्रात संस्थात्मक सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली.

या सामंजस्य करारामुळे सागरी वाहतुकीला चालना मिळेल, सीमा शुल्क आकारणीचे सुलभीकरण आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्याच्या पद्धतींचा वापर सुलभ होईल.

या करारामुळे दोन्ही देशातील जहाज कंपन्यांना दीर्घकालीन व्यापारासाठी द्विपक्षीय आणि बहुदेशीय व्यवस्था करता येईल.

B.Gokhale/S.Kane/Anagha