पीएम्इंडिया
भारत आणि सोमालियामध्ये कैद्यांच्या हस्तांतरणासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला आणि मंजूरी द्यायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.यामुळे सोमालियामधील तुरुंगातल्या भारतीय कैद्यांना, उर्वरित शिक्षेसाठी भारताकडे तर भारतीय तुरुंगातल्या सोमालियन कैद्यांना त्यांच्या मायदेशी सुपूर्द करणे सुलभ होणार आहे. ब्रिटन, श्रीलंका, ब्राझील, इराण, सौदी अरेबिया, कंबोडिया, इटली, दक्षिण कोरिया, बांगलादेश यासारख्या देशांबरोबर भारताने असा द्विपक्षीय करार केला आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor