Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-जर्मन विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (आयजीएसटीसी) च्या कालावधीला 2017 पासून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी भारत आणि जर्मनी दरम्यान, संयुक्त घोषणापत्र


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि जर्मनीच्या शिक्षण आणि संशोधन फेडरल मंत्रालय या दरम्यान, भारत जर्मन विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राच्या (आयजीएसटीएल) कालावधीला मुदत वाढ देण्यासंबंधीच्या संयुक्त घोषणापत्राबाबत माहिती देण्यात आली. द्विपक्षीय आयजीएसटीसीला कालावधी 2017 ते 2022 पर्यंत पाच वर्षाच्या कालावधीत मुदतवाढ देण्याबाबतचे हे घोषणापत्र आहे. निधी पुरवठयात दरवर्षीच्या 2 दशलक्ष युरोवरुन जास्तीत जास्त 4 दशलक्ष युरोपर्यंत वाढ करण्याची तरतूद या घोषणापत्रात आहे.

तंत्रज्ञान विकास आणि तंत्रज्ञानाचा वापर यासाठी संशोधनाचा उपयोग आणि नवीन विज्ञान विषयक पाया निर्मित करण्यासाठी दोन्ही देशातील शिक्षण आणि उद्योग क्षेत्राचा समावेश असणारे संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेण्यात येतील.

भारत आणि जर्मनीतील संशोधन प्रयोगशाळा, शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातील निवडक संशोधन आणि विकास प्रकल्पांना यामुळे सहाय्य मिळेल तसेच निधीही उपलब्ध होईल.

J.Patankar/I.Jhala/M.Desai