पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सीमा निश्चिती कायदा 2002 च्या कलम 11 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 9 मध्ये सुधारणा करायला मंजुरी दिली.
यामुळे भारत आणि बांग्लादेश यांच्या 31 जुलै 2015 रोजी बांग्लादेशी 51 भूभाग आणि 111 भारतीय भूभागांची देवाणघेवाण झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या कूच बिहार जिल्हयातील विधानसभा आणि संसदीय मतदारसंघांची सीमा निश्चित करणे निवडणूक आयोगाला शक्य होईल.
तसेच संसदेमध्ये निवडणूक कायदे (सुधारणा) विधेयक 2016 सादर करायलाही मंजुरी दिली.
S.Kane/S.Tupe/M.Desai