पीएम्इंडिया
2010 आणि 2012 च्या परिशिष्टानुसार भारत आणि बांग्लादेश यांच्यात सीमेवर बाजार (बॉर्डर हाट) स्थापन करण्यासंदर्भातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, 6 जानेवारी रोजी कार्योत्तर मंजुरी दिली.
दोन्ही देशांच्या सरहद्दीवर दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी स्थानिक चलन आणि विनिमयाद्वारे स्थानिक उत्पादनांसाठी पारंपरिक पणन व्यवस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे, हा या बॉर्डर हाट अर्थात सीमेवरील बाजाराचा हेतू आहे. 2010 आणि 2012 मधील करार पुढीलप्रमाणे :-
मेघालय-बांग्लादेश सरहद्दीवर कलाईचार आणि बालट येथे तर त्रिपुरा बांग्लादेश सरहद्दीवर कमलासागर आणि श्रीनगर येथे अशा प्रकारचे सीमा बाजार तथा बॉर्डर हाट आधीपासूनच कार्यान्वित आहेत. या व्यतिरिक्त बांग्लादेशच्या सरहद्दीवर मेघालय येथे चार तर त्रिपुरा येथे दोन बॉर्डर हाट स्थापन करण्याबाबत दोन्ही देशाच्या सरकारांनी सहमती दर्शवली आहे.
M.Pange/S.Tupe/M.Desai