Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-मॉरिशस सहकारितेसाठी आंतर-शासकीय करार


भारत आणि मॉरिशस यांच्यात सहकारिता सहकार्यासाठी आंतर-शासकीय करार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

हा करार पाच वर्षांसाठी लागू राहील. त्यानंतर पुढच्या पाच वर्षांसाठी त्याचा विस्तार होईल. करारात उल्लेख केलेल्या बाबींसंदर्भात भागिदारी वाढविण्याच्या दृष्टीने लघु आणि मध्यम अवधीच्या उपक्रमांना या करारामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. कराराची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोन्ही देश परस्पर सहमतीने एक कार्य योजना तयार करणार आहे.

M.Pange/B.Gokhale