पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 37,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह भू-पृष्ठावरील कोळसा/लिग्नाइट गॅसिफिकेशन प्रकल्पांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे.
ही योजना भारताच्या कोळसा/लिग्नाइट गॅसिफिकेशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी, 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचे राष्ट्रीय लक्ष्य साध्य करण्यासाठी, ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि एलएनजी (50% पेक्षा जास्त आयात), युरिया (~20% आयात), अमोनिया (~100% आयात) आणि मिथेनॉल (~80-90 % आयात) यांसारख्या प्रमुख उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
एक महत्त्वपूर्ण पूरक सुधारणेअंतर्गत, सरकारने “कोळसा गॅसिफिकेशनकडे नेणाऱ्या सिन्गॅसचे उत्पादन” या उप-क्षेत्रासाठी बिगर -नियमित क्षेत्र (NRS) संलग्न लिलाव चौकटीअंतर्गत कोळसा लिंकेजचा कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढवला आहे, ज्यामुळे कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांमधील गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन धोरणात्मक निश्चितता प्राप्त झाली आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
धोरणात्मक आणि आर्थिक लाभ :
पार्श्वभूमी:
भारताकडे कोळशाचा (~401 अब्ज टन) आणि लिग्नाईटचा (~47 अब्ज टन) जगातील सर्वात मोठा साठा उपलब्ध आहे. देशाच्या एकूण ऊर्जा गरजेपैकी 55% पेक्षा जास्त वाटा कोळशाचा आहे. गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे कोळसा किंवा लिग्नाईटचे रूपांतर ‘सिंथेसिस गॅस’ (सिनगॅस) मध्ये केले जाते. हा वायू इंधन आणि रसायने तयार करण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त कच्चा माल आहे. यामुळे भारताला खर्चिक आयातीला पर्याय शोधणे शक्य होईल आणि जागतिक पुरवठ्यातील अडथळे किंवा किमतींमधील चढ-उतारांपासून संरक्षण मिळेल.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये एलएनजी (LNG), युरिया, अमोनियम नायट्रेट, अमोनिया, कोकिंग कोल, मिथेनॉल आणि डीएमई (DME) यांसारख्या वस्तूंसाठी भारताचे आयात बिल सुमारे 2.77 लाख कोटी रुपये इतके होते. पश्चिम आशियातील सध्याच्या भूराजकीय अस्थिरतेमुळे ही आयात अवलंबित्व भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
2021 च्या ‘राष्ट्रीय कोळसा गॅसिफिकेशन मिशन’ आणि जानेवारी 2024 मध्ये मंजूर झालेल्या 8,500 कोटी रुपयांच्या योजनेच्या (ज्या अंतर्गत 6,233 कोटी रुपयांचे 8 प्रकल्प आधीच प्रगतीपथावर आहेत) यशानंतर, आता ही नवीन योजना अधिक व्यापक आर्थिक पाठबळासह या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी सज्ज आहे.
***
नेहा कुलकर्णी / सुषमा काणे / वैभवी जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
The scheme for Promotion of Surface Coal/Lignite Gasification Projects that has been cleared by the Cabinet will further energy security, boost investment and create job opportunities for the youth. It will add strength to our efforts to strengthen the tech and innovation system…
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2026