पीएम्इंडिया
भोपाळ मेमोरिअल हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये काम करणाऱ्या जनरल डयुटी मेडिकल ऑफिसर्स, तज्ञ श्रेणी डॉक्टर्स आणि वैद्यकीय शाखेतील अध्यापकांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवून ती इतर केंद्र सरकारी रुग्णालये/संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांप्रमाणे 65 वर्षे करावी, या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाचा हा प्रस्ताव होता.
जानेवारी 2018 तील अधिसूचनेनुसार केंद्रीय आरोग्य सेवेच्या अध्यापन, बिगर अध्यापन आणि सार्वजनिक आरोग्य सब-कॅडर्समध्ये समाविष्ट जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर्स आणि तज्ञांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवून 65 वर्ष करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे अध्यापक आणि तज्ञ डॉक्टरांची उणीव दूर होण्यास मदत होईल तसेच भोपाळ गॅस दुर्घटनेतील पिडितांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अधिक चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar