Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मंत्रिमंडळाने भारत आणि नेदरलँड दरम्यान वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या स्वारस्य कराराला (MoI) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला औषध मूल्यांकन मंडळ, आरोग्य आणि युवा देखभाल निरीक्षक, मानवी विषयांचा समावेश असलेल्या संशोधनावरील केंद्रीय समिती यांच्या वतीने “वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्यावर” भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) आणि नेदरलँडच्या आरोग्य, कल्याण आणि क्रीडा मंत्रालयादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या स्वारस्य कराराची माहिती देण्यात आली. 7 नोव्हेंबर 2023 रोजी या स्वारस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

औषध मूल्यांकन मंडळ, आरोग्य आणि युवा देखभाल निरीक्षक, वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने मानवी विषयांचा समावेश असलेल्या संशोधनावरील केंद्रीय समिती यांच्या वतीने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) आणि नेदरलँडच्या आरोग्य, कल्याण आणि क्रीडा मंत्रालया दरम्यान झालेला स्वारस्य करार फलदायी सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक चौकट उभारण्याचा  प्रयत्न करतो.

उभय देशांच्या नियामक प्राधिकरणांमधील स्वारस्य करार औषध निर्मितीसाठी कच्चा माल, जैविक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि कॉस्मेटिक उत्पादने यासह औषध निर्मितीच्या संदर्भात वैद्यकीय उत्पादनांचे नियमन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सुलभ करेल.

भारतातून औषधांची निर्यात वाढविण्यात नियामक पद्धतीतील अभिसरण मदत करू शकते आणि परिणामी औषध निर्माण क्षेत्रातील सुशिक्षित व्यावसायिकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

हा स्वारस्य करार वैद्यकीय उत्पादनांची निर्यात सुलभ करेल ज्यामुळे परकीय चलन कमावले जाईल. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल असेल.

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai