Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मणिपूरचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युमनाम खेमचंद सिंग यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

तसेच पंतप्रधानांनी नेमचा किपगेन आणि लोसी डिखो यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. याशिवाय कोंथौजम गोविंदास सिंग आणि खुरैजम लोकेन सिंग यांनी मणिपूर सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.

नवीन नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की ते मणिपूरच्या भगिनी आणि बंधूंच्या विकास आणि समृद्धीसाठी निष्ठेने काम करतील.

एक्स वरील पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे :

“मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल युमनाम खेमचंद सिंग यांचे अभिनंदन.

राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नेमचा किपगेन आणि लोसी डिखो यांचे तसेच मणिपूर सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल कोंथौजम गोविंदास सिंग आणि खुरैजम लोकेन सिंग यांचेही मी अभिनंदन करतो.

मणिपूरच्या माझ्या बंधू-भगिनींच्या विकास आणि  समृद्धीसाठी ते निष्ठेने  काम करतील, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.”

निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai