नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना केली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. तसेच, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील एका संदेशात म्हटले आहे की,
“मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीचे वृत्त ऐकूण अतिशय दुःख झाले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी शोकसंवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल.
@narendramodi”
Distressed to learn about the loss of lives due to a mishap in Gwalior, Madhya Pradesh. My condolences to the bereaved families. Praying for the speedy recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of those who lost their lives. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 18, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Distressed to learn about the loss of lives due to a mishap in Gwalior, Madhya Pradesh. My condolences to the bereaved families. Praying for the speedy recovery of the injured. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of those who lost their lives. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 18, 2026