Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मलेशियाबरोबर सुधारित हवाई सेवा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मलेशियाबरोबर सुधारित हवाई सेवा कराराला मंजुरी देण्यात आली आहे.

या हवाई सेवा करारामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया 2011 मध्ये सुरू झाली होती. मात्र, कलम 13 म्हणजेच मिळकतीच्या भरपाईशी संबंधित कलमासंदर्भात काही बदल हवे असल्यामुळे हा करार होऊ शकला नव्हता. इकान-2016 मध्ये झालेल्या बैठकीमध्ये भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने सुचवलेल्या संबधित कलमातील मजकुरामध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली.

हवाई सेवा कराराची वैशिष्ट्ये

•सध्या अस्तित्वात असलेल्या करारावर 1974 मध्ये स्वाक्ष-या झाल्या होत्या. त्यामुळे हा करार अद्ययावत, सुधारित व आधुनिक करण्याची गरज आहे.

•नव्या आयसीएओ अर्थात आंतरराष्ट्रीय नागरी हवाई संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्या अस्तित्त्वात असलेला हवाई सेवा करार बदलण्यात आला आहे.

•तिसऱ्‍या देशाच्या विमान कंपन्यांसाठी सहकारी पणन व्यवस्था समाविष्ट करण्यात आली आहे.

•स्थानिक नियम विभागणीसंदर्भात कलम समाविष्ट केले आहे.

•सुधारित हवाई सेवा करारात “सुरक्षितता आणि सुरक्षा” या विषयीची कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत.

•सुधारित हवाई सेवा करारात “आंतरमध्य सेवा” संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांमुळे इतर पक्षाच्या प्रदेशातील कोणत्याही स्थानापासून आंतरमध्य वाहतुकीच्या पर्यायाद्वारे प्रवासी व माल हाताळणी करता येऊ शकेल.

N.Sapre/S.Patil/Anagha