पीएम्इंडिया
महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परदेशात रोजगार मिळवण्यासाठी जाणा-या ईसीआर श्रेणीतील कामगारांसाठी 2012 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेंतर्गत अत्यल्प नोंदणी होत असल्याने तसेच वर्षभराहून अधिक काळ यात एकही नवी नोंदणी न झाल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
N.Sapre/S.Patil/Anagha