पीएम्इंडिया
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 70 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अरुंधती चौधरी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की, अरुंधती चौधरी यांनी आपल्या शानदार विजयासह इतिहास रचला आहे. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचे आणि अढळ आत्मविश्वासाचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी अरुंधती यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, आगामी काळातही त्या अशाच अनेक यशांची नोंद करतील, असा विश्वास व्यक्त केला.
समाजमाध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “ग्लासगो राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 70 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून अरुंधती चौधरी यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि अढळ आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आगामी काळातही त्यांना अशीच अनेक यश मिळोत, हीच शुभेच्छा.
#CWG2026″
Arundhati Choudhary scripts history with a brilliant Gold in the Women’s 70 kg Boxing event at the Glasgow Games! She displayed technical excellence and unwavering confidence. Congratulations to her. Wishing her many more successes in the years ahead.#CWG2026
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2026
***
यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]