Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईतील “मेक इन इंडिया” सप्ताह

s2016021377279

s2016021377276

s2016021377274


मुंबईतील “मेक इन इंडिया सेंटर एक्स्पो”चं उद्‌घाटन केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वीडन आणि फिनलंडचे पंतप्रधान तसंच पोलंडचे उपपंतप्रधान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हफेन् यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मेक इन इंडिया” उपक्रमातील स्वीडनच्या लक्षणीय सहभागाबद्दल प्रशंसा केली. संरक्षण, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वैद्यकीय उपकरणं आदी क्षेत्रात स्विडीश कंपन्यांना भागीदारीसाठी त्यांनी आमंत्रित केले.

फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिलो यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी अभियांत्रिकी, ऊर्जा प्रकल्प, जैवतंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात फिनलंडनं सक्रीय सहभाग द्यावा, असं आवाहन केलं. तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करत, दोन्ही पंतप्रधानांनी चेन्नई इथल्या ट्रीव्हिट्रॉन हेल्थकेअरच्या उत्पादन विभागाचं टेली उद्‌घाटन केलं.

पोलंडचे उपपंतप्रधान डॉ. पिओत्र ग्लिन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जामनगरच्या माध्यमाद्वारे जोडल्या गेलेल्या गुजरात आणि पोलंडमधील प्रदीर्घ संबंधांना उजाळा दिला. अन्नप्रक्रिया, स्वच्छ ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रातील सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली.

N. Chitale / J. Patankar / S. Tupe / M. Desai