Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांच्या संयुक्त निवेदनानंतर प्रसारमाध्यमांशी केलेली चर्चा

युकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांच्या संयुक्त निवेदनानंतर प्रसारमाध्यमांशी केलेली चर्चा

युकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांच्या संयुक्त निवेदनानंतर प्रसारमाध्यमांशी केलेली चर्चा


हे खर आहे की, 10 वर्षांच्या दीर्घकालानंतर, आज पुन्हा माझ्या कार्यकाळात मागिल वर्षभरात 11 मंत्र्यांनी भारतातून यूकेला आणि यूके मधून 11 मंत्र्यांनी भारताला भेट दिली आहे आणि म्हणूनच भारत आणि ब्रिटनचे जे संबंध आहेत ते विकासाच्या नवीन उंची गाठण्याचे सामूहीक प्रयत्न आहेत, जे निरंतर आहेत. मलाही पंतप्रधानांबरोबर दोन वेळा विस्ताराने चर्चा करण्यांची संधी प्राप्त झाली. आमचे संबंध अधिक दृढ होण्यांस वाव मिळाला.

तुम्ही अजून एका विषयावर प्रश्न विचारला आहे, भारत – बुदृधाची भूमी आहे. भारत गांधींची भूमी आहे. आणि यासाठीच आमच्या संस्कारांमधे एक गोष्ट आहे ती म्हणजे समाजाच्या मूलभूत मूल्यांच्या विरुध्द कुठलीही बाब भारत स्विकारत नाही आणि म्हणूनच देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठलीही विघटीत घटना घडली, भारतीयांसाठी ती घटना एक असो दोन असो किंवा तीन असो, सव्वाशे कोटींच्या देशांमध्ये घडलेल्या घटनेचे महत्व आहे की नाही याचे महत्व नसून आमच्यासाठी प्रत्‍येक घटना ही गंभीर असते. आम्ही कुठल्याही बाबतीत अप्रिय घटना स्विकारत नाही. कायदा कठोरतेने कार्रवाई करतो आणि करत राहील. भारत एक विकसित लोकशाही असून संविधानांतर्गत सामान्यांतल्या सामान्य नागरिकांच्या जीवनांसाठी प्रत्येक प्रकारची सुरक्षा त्यांच्या विचारांचे रक्षण यासाठी प्रतिबद्ध आहोत आणि यासाठी आम्ही वचनबद्द आहोत.

दहशतवादाविरुध्द भारत युके सहकार्य

धन्यवाद!

आतंकवादावर आपण जी चिंता व्यक्त केली ती चिंता मानवतावादावर विश्वास करणा-या प्रत्येकाची काळजी असेल आणि मी अत्यंत समाधानाने सांगू इच्छितो की, संयुक्त राष्ट्रसंघात आतंकवादावर जितके उपाय अवलंबीले त्यामध्ये भारत आणि ब्रिटनने खांदयाला खांदा लावून कार्य केले आहे. अफगााणिस्तानमध्ये ब्रिटनने ब-याच सैनिकांना जीवनदान दिले. तर भारतानेही कितीतरी चांगल्या सैनिकांना गमावले आहे. आम्ही दोन्ही देशांतील आतंकवाद यामुळे त्रासलो आहोत. यासाठी आतंकवादाविरुध्द लढणे हा केवळ एक , दोन, किंवा तीन राष्ट्रांचा विषय नाही तर मानवतावादी दृष्टीकोन असलेल्या सगळयांची जबाबदारी आहे. आज आतंकवाद अशा प्रकारांनी विस्तारला आहे की, त्याला काही सीमा नाही. त्याला कुठलाही भूभाग नाही. प्रत्येक दिवशी नवीन संघटनेचे नाव जन्मास येते. प्रत्येक दिवशी नवीन अवजार त्यांच्या हातात असत. आता आतंकवादी काही अवजार निर्मिती करणारे निर्माते तर नाहीत. सर्वांत प्रथम महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार न्याय तेव्हा येतो जेव्हां तुम्हाला अन्याय कशाला म्हणतात याचे ज्ञान आहे. आम्ही आतंकवादी कुणाला म्हणतो आतंकवादयांना मदत कोण करतो संयुक्त राष्ट्र संघामध्ये या विषयावर आतंकवादाची व्याख्या करण्याचा प्रस्ताव आला. परंतु अजूनपर्यंत यावर कुठलाही निर्णय झाला नाही. तो असाच अनिर्णित पडून आहे. भारत आणि ब्रिटेन ही दोन्ही राष्ट्रे आतंकवादाची व्याख्या व्हायला हवी यावर ठाम आहेत आणि यासाठीच मानवतावादी शक्तींनी एकत्रित येणे महत्वाचे आहे. जे आतंकवादी आहेत, आतंकवादयांना मदत करतात अशा शक्तींना दूर केले पाहिजे. आणि मानवतावादाची रक्षा करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.

संयुक्त राष्ट्र संघाला भेट देण्यांचे निमंत्रण, जर युरोपीयन युनियन मधून यूके वेगळा झाल्यास, भारत युके भविष्यातील संबंध वृध्दिंगत करण्यांवर जोर

एक तर भूतकाळातील नोंदी ठेवणे, यासाठी मी तुम्हाला एक माहिती सांगतो. मी 2003 मध्ये येथे आलो होतो त्यावेळीसुध्दा मोठया प्रमाणावर माझे स्वागत आणि सन्मान करण्यांत आला. मी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. यूकेनी केव्हांही माझ्या यूके भेटीवर प्रतिबंध लावला नाही. माझ्या वेळेच्या कमतरतेमुळे मी येऊ शकलो नाही ही बाब वेगळी म्हणजेच ही ग्रहण क्षमताच चुकीची आहे. यामध्ये दुरुस्ती आवश्यक आहे.

दुसरी बाब ही की, दोन वर्षांनंतर जननिर्देश होईल, मी असे समजतो की, येथील नागरीक खूपच समजूतदार अहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची टीप देण्यांची आवश्यकता नाही. परंतु इथे भारतापुढे एक प्रश्नचिन्ह आहे, युरोपियन युनियन मध्ये प्रवेश करण्यांचे जर कुठले प्रवेशद्वार असेल तर ते ब्रीटन बरोबर आहे. आम्ही याच प्रवेशद्वाराद्वारे युरोपच्या बाकी देशांमध्ये जात आहेत. आमचे भले यातच आहे.

व्यापार आणि आर्थिक सहकार्य वृध्दिंगतेवर भारताच्या युके कडून अपेक्षा

बघा, आता भाारत ज्या दिशेने प्रगती करतो आहे, प्रगती करण्याची इच्छा आहे, जसा आमचा… एक छोटेसे उदाहरण देतो, आमच्या येथे टेले डेन्सीटी खूप आहे. जवळपास 27-28 हजार टॉवर्स आहेत. ते डिजेलचा उपयोग करतात आणि आम्हाला डिजेल आयात करावे लागते. जे वातावरणाला नुकसानदायक आहे. युके जवळ हायड्रोजन इंधन सेल चे तंत्रज्ञान आहे. आम्हाला असे वाटते की, भारताकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध असायला हवे. तर आमच्याकडे हे जे 27-28 हजार टॉवर्स आहेत, जे भविष्यात 48 हजारांपर्यंत वाढण्यांची शक्यता आहे ज्यासाठी आम्हाला डिजेल आयात करावे लागते यापासून आम्हाला मुक्ती मिळेल आणि आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मदत करु शकू. हे तंत्रज्ञान आम्हाला उपलब्ध होईल. आमच्यायेथे कोळशाच्या खाणी आहेत. आता ग्रीड टैक्नोलॉजी पासून कोल मायनींग कसे करणार? कोल गॅसिफिकेशन कसे करणार? आम्ही स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने कसे जाऊ?

कौशल्य विकास—युकेनी एकत्रित कौशल्य विकासाच्या दिशेने खूप महत्वपूर्ण कार्य केले आहे. आरोग्य क्षेत्रात चांगल्या रुग्णालयांच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. या सा-या विषयांवर चर्चा झाली आहे आणि या सा-या गोष्टींचा उपयोग भारताच्या गरिबातल्या गरीब व्यक्तिला होईल. त्यांना वैश्विक गुंतवणूक कामाला येऊ शकते. आणि याच दिशेने आमच्या प्रयत्नांमधिल आजची माझी ही युके यात्रा आहे असे मी म्हणू शकतो. या सा-या गोष्टी आम्ही यशस्वीतेने पुढे नेवू.

B.Gokhale./M. Desai