Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

यूकेच्या परराष्ट्र सचिवांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

यूकेचे परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि अलिकडच्या काळात भारत-यूके भागीदारी अधिक दृढ झाल्याबद्दल कौतुक केले. यामुळे उभय  देशांसाठी विकासाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत.

पंतप्रधानांनी पुष्टी केली की, ‘भारत-यूके व्हिजन 2035’ भागीदारीला मार्गदर्शन करत राहील आणि जागतिक हितासाठी संयुक्त प्रयत्न अधिक बळकट करेल.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले:

यूकेचे परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर यांना भेटून आनंद झाला. अलिकडच्या काळात भारत-यूके भागीदारी अधिक दृढ झाल्याबद्दल कौतुक केले, ज्यामुळे आपल्या दोन्ही देशांसाठी विकासाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत.

भारत-यूके व्हिजन 2035 आपल्या भागीदारीला मार्गदर्शन करत राहील आणि जागतिक हितासाठीचे आपले संयुक्त प्रयत्न अधिक बळकट करेल. @YvetteCooperMP”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai