पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 14 मे 2026
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनिमित्त, डिसेंबर 2025 मध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट झाली होती. तेव्हापासून उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीविषयी, लावरोव्ह यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
परराष्ट्र मंत्री लावरोव्ह आणि पंतप्रधान यांच्यात युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीसह, इतर अनेक परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा झाली.
सगळे प्रश्न सोडवून, पुढे जाण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्राधान्य देण्याच्या भारताचा सातत्यपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना आपल्या शुभेच्छा सांगाव्यात, अशी विनंती, पंतप्रधानांनी, परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांना केली.
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Pleased to receive Russia’s Foreign Minister Sergei Lavrov. Thanked him for an update on the progress on various facets of our Special & Privileged Strategic Partnership.
— Narendra Modi (@narendramodi) May 14, 2026
We also exchanged views on various regional and global issues, including situation in Ukraine and West… pic.twitter.com/fg9YL1b0Se