Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


नवी दिल्ली, 14 मे 2026

रशियाचे परराष्ट्र मंत्री  सर्गेई लावरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

23 व्या भारत-रशिया  वार्षिक शिखर परिषदेनिमित्त, डिसेंबर 2025 मध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट झाली होती. तेव्हापासून उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीविषयी, लावरोव्ह यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

परराष्ट्र मंत्री लावरोव्ह आणि पंतप्रधान यांच्यात युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीसह, इतर अनेक परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा झाली.

सगळे प्रश्न सोडवून, पुढे जाण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्राधान्य देण्याच्या भारताचा सातत्यपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना आपल्या शुभेच्छा सांगाव्यात, अशी विनंती, पंतप्रधानांनी, परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांना केली.

निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai