Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजकोट येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांचा शोकसंदेश


नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राजकोट येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. “राजकोटमध्ये  रुग्णालयाला लागलेल्या आगीत जी जीवितहानी झाली त्याचे मला अतीव दुःख होत आहे. या दुर्दैवी घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्याबद्दल मला सहवेदना आहे. दुर्घटनेतील जखमींना लवकरच आराम पडावा ही प्रार्थना. या दुर्घटनेची झळ पोहोचलेल्याना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे.”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane