Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

रानी गाइदिन्‍ल्‍यू यांच्‍या जन्‍म शताब्‍दी वर्षाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


उपस्थित सर्व मान्‍यवरांनो,

रानी माँ यांचा जन्‍मशताब्‍दी सोहळा आपण साजरा करत आहेत. मी रानी माँ यांच्‍या पुढे नममस्‍तक होऊन त्‍यांच्‍या प्रति आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. राणी मॉंचे जीवनकार्य आम्‍हाला अशीच प्रेरणा देत राहो. देशाची एकता, अखंडता टिकवून आपल्‍याला विकासाची नवी शिखरे कशी चढता येतील, याचे स्‍वप्‍न ज्यांनी पाहिले, त्‍यांमध्‍ये राणी मॉं होत्‍या.

स्‍वातंत्र्यानंतरच्‍या इतक्‍या वर्षामध्‍ये देशाच्‍या कानाकोप-यात अनेक स्‍वातंत्र्य वीरांचा इतिहास पडद्याआडच राहीला, हे आपल्‍या देशाचे मोठे दुर्भाग्य आहे. समाजाची ही जबाबदारी आहे की त्‍यांनी आपला महान पराक्रमांचा तसेच महान इतिहासाचा ठेवा जपला पाहिजे आणि त्‍याचा वारसा पुढील पिढ्यांना हस्‍तांतरित केला पाहिजे आणि हे सातत्याने होत राहिले पाहिजे.त्‍यामुळेच समाजासाठी जगण्‍याची व मरण्‍याची प्रेरणा मिळेल. तसेच, इतिहास हा राजघराण्‍यांच्‍या आस पास, राज्‍यकर्त्‍यांच्‍या आस-पास चित्रीत होतांना दिसतो, अशी काहीशी धारणा आहे. भारत हा एका वेगळया परंपरेने नटलेला देश आहे. येथे जन-सामान्‍यांच्‍या पराक्रमांना अधिक महत्‍व दिले जाते. हा देश राजा महाराजांनी बनवला, अशी या देशाची धारणा कधीच नव्हती. हा देश सामान्‍य जनांचा आहे. त्‍यांच्‍या पुरूषार्थाने, पराक्रमाने, त्‍यांच्‍या घामाच्‍या सुगंधाने हा देश पल्‍लवित झाला आहे अशीच इथली मूलभूत धारणा आहे. जोपर्यंत आपण या राज्यकर्त्‍यांच्‍या,शासकांच्‍या चौकटीतून बाहेर येत नाही, आपला कॅमरा त्‍या ठिकाणाहून बाहेर येत नाही, तोपर्यंत सामान्‍य लोकांच्‍या या शक्‍तीची प्रचीती आपल्‍या लक्षात येणार नाही.

राणी माँ चे जन्‍म शताब्‍दी वर्ष आम्‍ही साजरे करत असतांना दिल्‍लीमध्‍ये लोक प्रश्‍न विचारतात, की ही कोण आहे ? काय आहे ? हे तुम्‍ही काय करत आहात ? दोष प्रश्‍न विचारणा-यांचा नाही. दोष आपल्‍या व्‍यवस्‍थेत जी विकृति आली, तिचा आहे. आणि याच कारणामूळे आपल्‍याला क्षणो-क्षणी प्रेरणा देणा-या अशा असंख्‍य महापुरूषांना आपण एक तर विसरलो किंवा जाणीवपूर्वक त्‍यांना विसरल्‍यासारखे केले आहे आणि अशा गोष्‍टी विसरण्यानी, दुर्लक्षित करण्यानी कोणत्‍याही समाजाला शक्‍ती मिळत नाही, प्रेरणा मिळत नाही.

गेल्‍या ६० वर्षांमध्‍ये मी असे मानतो की, राणी माँसारखे पूर्वोत्‍तरमध्‍ये अनेक महापुरूष आहे, राणी मॉं व्‍यतिरिक्‍त अनेक महापुरूष पण आहेत, ईशान्य भारताबद्दल बोलतो आहे. ज्‍यांचे जीवन इतके प्रेरणादायी ठरले आहे. गेल्‍या ६० वर्षामध्‍ये आपल्‍या सर्व पीढयांना-दोन पीढी, तीन-पीढी, चार-पीढी- जितक्‍या हिशोबात धरता येतील इतक्‍या पिढ्यांना जर यांच्‍याबद्दलचे शिकायला मिळाले असते, त्‍यांच्‍या विचारांना जाणून घेण्‍याची संधी मिळली असती तर, मला नाही वाटत की, या भूमीत कधीही वेगळेपणाची भावना निर्माण झाली असती. कारण,हे लोक ते होते, जे देशाच्‍या एकतेसाठी जगत होते आणि मरत होते.

कोणी अशी कल्‍पना करू शकते का, की या परंपरेला किंवा या परंपरेच्‍या नेत्‍याला – जादोनांग यांना ऐन तारूण्‍यात फाशी दिली जाईल, कारण ते फक्‍त स्‍वातंत्र्याचा आवाज बुलंद करत होते आणि अशा प्रकारे, या स्थितीत सर्व संघटन फुटु शकते. आता लोकांना असे वाटू शकते की, इतक्‍या लहान वयात तर हे फाशीवर चढले, मग आता आम्‍ही काय करू शकतो ? मनात प्रबळ इच्‍छा असूनसुद्धा अशा फाटाफुटीची शक्‍यता असते. आपण कल्‍पनाच करू शकतो की, राणी माँ यांच्‍यात असे कोणते संघटन-कौशल्‍य होते ज्‍यामुळे त्‍यांनी वयाच्या १२-१५ व्या वर्षीच आपल्‍या गुरूंच्‍या फाशीनंतर, तो झेंडा झुकू दिला नाही, संघटना तुटू दिली नाही आणि पंरपरेलापुढे नेण्‍यासाठी स्‍वत:ला झोकून दिले.

गुरूंच्‍या इच्‍छेनुसार शिष्‍य आपले आयुष्‍य पणास लावतात आणि त्‍यांच्‍यामधील संवादाची पण चर्चा होते. मला असे वाटते की, गुरु शिष्‍य परंपरेचे या सारखे मोठे उदाहरण कोणते नस् शकते, जिथे गुरु फासावर चढले आणि एक १३ वर्षे वयाची युवती तो झेंडा आपल्‍या हाती घेऊन, एका शिष्‍येच्‍या नात्‍याने , गुरूंचा आदेश पालन करण्यासाठी आपले सर्व आयुष्‍य खर्ची घालवेल, असे खूप कमी घडते. आपल्‍या तारूण्‍याची महत्‍वाची वर्षे कारागृहामध्‍ये काढतील आणि हे व्‍यक्तिमत्‍व इतके लहान नसेल की, पंडित नेहरू त्‍यांना भेटण्‍यासाठी करागृहात येतील-हे एक असामान्‍य व्‍यक्तिमत्‍व असेल ज्‍यामुळे हे शक्‍य झाले असेल, सशस्त्र क्रांतीवर विश्‍वास ठेवणा-या व्‍यक्‍तींवर बोलण्‍याचे साहस न करणारा एक वर्ग अस्तित्‍वात होता. परंतु प्रथमच राणी मॉं याला अपवाद ठरली. गुजरातमध्‍ये हरीपुरा येथील कॉंग्रेस अधिवेशनात जेव्‍हा सूभाष बाबू, अध्‍यक्ष झाले, तेव्हा राणी मॉं च्‍या मुक्‍ततेसाठी एक प्रस्‍ताव पारित करण्‍यात आला. हा कॉंग्रेस पक्षाचा एक मोठा व महत्‍वपूर्ण निर्णय त्‍याकाळी ठरला होता.

परंतु, देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतरही राणी मॉं यांना जेल मधून/कारागृहामधून मुक्‍त करण्‍यासाठी तीन-चार महिन्‍यांचा अवधी लागला, स्‍वातंत्र्यानंतरच्‍या तीन-चार महिन्‍यांमध्‍ये सुद्धा राणी माँ कारागृहातच होत्‍या. आणि याहून मोठे दुर्भाग्‍य-दुदैव हे होते की, स्‍वातंत्र्यानंतर रानी माँ यांना राजनैतिक कारणांमुळे आणि आपल्‍याकडील राजनितीमध्‍ये आलेल्‍या विकृतींमुळे स्‍वातंत्र्यानंतरही त्‍यांच्‍या गावामध्‍ये प्रवेश नाकारण्‍यात आला.

स्‍वतंत्र भारतात ज्‍या स्‍वातंत्र्यासाठी राणी मॉं आपले आयुष्‍य खर्ची घालवण्‍यासाठी तयार होत्‍या, ज्‍यांनी कधीच आपले मस्‍तक इंग्रजापुढे झुकवले नाही, त्या राणी मॉं यांना १० वर्षांपर्यंत आपल्‍याच स्‍वतंत्र भारतात भूमिगत होऊन रहावे लागते आणि याचे कारण ? जाति व असहिष्‍णुता होते. त्‍या निसर्गाची पूजा करत होत्‍या, निसर्गाला परमात्‍मा मानत होत्‍या आणि आज वातावरणबदलाचे/ग्‍लोबल वार्मिंगचे जे संकट जगावर ओढवले आहे, त्‍यांला जर राणी मॉंचे उपदेश-जे निसर्गप्रेमाचे उपदेश आहेत ते कळले तर पर्यावरण संबंधी ज्‍या समस्‍या आहे. त्‍यांचे उत्‍तर – समाधान रानी मॉं यांच्‍या तत्‍वज्ञानातून मिळेल.

त्‍या निसर्गपूजेच्‍या/उपासनेच्‍या पुरस्‍कर्त्‍या होत्‍या आणि त्यांची संपूर्ण परंपरा, संपूर्ण संप्रदाय/समूह निसर्ग उपासनेचा पुरस्कर्ता राहला आहे. परंतु त्‍यांना न मानणाऱ्‍यांनी, त्‍यांचे जगणे कठीण केले होते. भारतमाध्‍ये त्यांना तब्‍बल १० वर्षे भूमिगत जीवन जगावे लागले. नंतरच्‍या काळात परिस्थिती थोडी स्थिर झाली. त्‍यांनी आपल्‍या सेवाकार्यामध्‍ये आयुष्‍य घालवले प्रसंगी,मान-सन्‍मानांच्‍या कार्यक्रमांमुळे कधी-कधी बातम्‍यांमध्‍ये त्‍या झळकत होत्या. परंतु आयुष्‍याच्‍या शेवटपर्यंत त्‍यांनी आपला समाजसेवेचा मार्ग सोडला नाही.

निसर्ग-उपासनेला प्रतिकुल अशा वातावरणातसुद्धा त्‍यांनी तो मार्ग सोडला नाही, लोकांना प्रोत्‍साहित करत राहिल्‍या, परंतु त्या वीरांगणा होत्या, संघर्षाची वाट न धरता त्यांनी समन्‍वयाचा मार्ग स्‍वीकारून स्‍वातंत्र्याच्‍या काळात आपले संपुर्ण आयुष्‍य समाजाच्‍या विकासासाठी अर्पण केले. याच अर्थाने, मी असे मानतो की, प्रामुख्‍याने या ठिकाणी-फक्‍त ईशान्येच नाही तर भारताचे असे कित्‍येक भाग आहेत-जे‍थील महापुरूषांना आपल्‍या प्रेरणादायी पुरूषांच्‍या रूपात, प्रेरणादायी व्‍यक्तिमत्‍वाच्‍या रूपात जर आपण दाखवु शकलो तर आपल्‍या नव्‍या पाढीला………. राणी माँ सशस्‍त्र क्रांतीच्‍या कारणामूळे कारागृहात गेल्‍या होत्या. त्‍यांच्‍या गुरूंना फाशी झाली होती. परंतु रानी माँ स्‍वत: १९३२-३५ च्‍या कालखंडात महात्‍मा गांधीचे गुणगाण संपूर्ण ईशान्य भारतात करत होत्‍या. एक प्रकारे, महात्‍मा गांधीना ईशान्य भारतात परिचित करून देण्‍याचे महान कार्य रानी मॉ यांनी केले.

त्‍या सदैव हे स्‍वप्‍न पाहत होत्‍या, त्‍या नेहमी म्‍हणत होत्‍या की, नागा संस्‍कृती,नागापरंपरा कायम राहिल्‍या पाहिजे. मला नागा असल्‍याचा गर्व आहे. परंतु हे सर्व देशाच्‍या अखंडता व एकतेसाठी झाले पाहिजे. राणी माँ हे त्‍यावेळी बोलत होत्‍या. त्या संपूर्ण भारताच्‍या स्‍वातंत्र्याची संकल्‍पना करत होत्‍या. त्‍यांच्‍या भाषेत त्या म्‍हणत होत्या की, गांधी एक दिवस राजा बनतील,महात्‍मा गांधी एक दिवस राजा बनतील. हे त्‍या त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या लोकशाहीच्‍या व्‍याख्‍येच्‍या दृष्‍टीने बोलत होत्या. परंतु मूळ संकल्‍पना भारत स्‍वतंत्र व्‍हावा, हीच होती.आणि महात्‍मा गांधी या समाजाचे नेतृत्‍व करतील, हे स्‍वप्‍न राणी मॉ नहमी बोलून दाखवायच्‍या आपल्‍या लोकांना त्‍या प्रशिक्षण देत राहायच्‍या.

आणि ज्‍यांनी अशाप्रकारे आपल्‍याला हे आयुष्‍य दिले, अशा सर्वमहापुरूषाप्रती आपले कर्तव्‍य आहे की…….. आज कधी आपण अंदमान-निकोबारच्‍या सेल्‍युलर जेलमध्‍ये गेलो,तर देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या क्रांतीविरांची यादी दिसते. त्‍या यादीकडे पाहल्‍यास हे लक्षात पण येत नाही की, इतिहासाच्‍या कोणत्या कोपऱ्‍यात हे दडलेले असतील. त्या ठिकाणी तर एका दगडावर त्यांची नावे कोरलेली आहेत. परंतु, देशाच्‍या त्‍या कोपऱ्‍यात, त्या गावात हे क्रांतीवीर जन्‍मास आले, त्‍या गावातील मुलांनाही हे कदाचितच माहित नसेल की, आपल्‍या गावातही असा व्‍यक्‍ती होता जो१०० वर्षापूर्वी अंदमान-निकोबारच्‍या जेलमध्‍ये जाऊन भारतमातेच्‍या स्‍वातंत्र्यासाठी संघर्ष करत असेल, ही गोष्‍ट त्‍यांना माहित नसेल.

आणि आपण जे हे महान………. आपल्‍या समाज जीवनामध्‍ये कमतरता/त्रुटी राहून गेली आहे. आपण त्‍याची पूर्तता केली पाहिजे. आपल्या विद्यापीठामध्‍ये संशोधक, विद्वान संशोधन करत असतात. अशा विद्यापीठांमध्‍ये, प्रत्‍येक तुकडीत एक-दोन, विद्यार्थी का असू नयेत? जे समाजातील अशा-प्रकारच्‍या लोकांवर संशोधन करू शकतील, प्रबंध लिहू शकतील? ईशान्य भारतातील या महान व्‍यक्‍ती, समाज क्रांती करणा-या, राष्‍ट्रीय क्रांती करणा-या, व्‍यक्‍तींवर आपली विद्यापीठे त्‍या ठिकाणच्‍या नव्‍हे तर दुसऱ्‍या भागातली -दक्षिणेकडील, पश्चिमकडील, उत्‍तरे कडील संशोधन करू लागलीत, तर लोकांना वाटेल, की खरच इथे असे पण लोक अस्तित्वात होते.

हे एकात्‍मकतेसाठी पण आवश्‍यक आहे. आणि मला वि‍श्‍वास आहे की, येणा-या दिवसात जी गोष्‍ट मणिपुरच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी सांगितली, नागालँडच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी सांगितली, त्‍यांच्‍या भावनाचा, आदर करून या सर्वांना आपण अधिक कसे वृद्धिगत करू ? याची जबाबदारी पुर्ण देशावर आहे. जी आपल्‍याला पार पाडावी लागेल.

अशाच प्रकारे, मा राणी मॉ यांनी आपले संपूर्ण आयुष्‍य जेलमध्‍ये खर्ची घातले.व्‍यक्तिगत तर त्‍यांना काहीच प्राप्‍त करण्‍यासारखे नव्‍हते,त्‍यांनी हेच स्‍वप्‍न बघितले होते की, आपला देश नवी शिखरे पार करेल, विकास करेल आणि जोपर्यंत पूर्वी भारत प्रगतीपथावर जात नाही उत्‍तर-पूर्व चा विकास होत नाही, आपली ही अष्‍टलक्षी जोपर्यंत प्रगति करत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही.

आणि याकरिताच तुमच्‍या लक्षात आले असेल की सरकारने पायाभूत संरचनेसाठी ईशान्य भारताला सर्वाधिक आर्थिक साहय्य दिले. कारण एकवेळ तेथे ह्या पायाभूत संरचनाची निर्मिती झाली की, तेथे तर………. मी तिथे /त्‍या ठिकाणी होतो, तेव्‍हा मला कळाले, की कोणता असा ईश्‍वराचा आशिर्वाद हया भू-भागावर आहे जो इतर भू-भागाच्‍या ऐकिवात सुद्धा नाही ? थोडा हा दळणवळणाचा मुद्दा सुटला तर……….. तुम्‍ही बघत असाल, मी आज-काल विद्यापीठातल्‍या विद्यार्थ्‍यांना सांगितले, की तुम्‍ही जरा पर्यटकांच्‍या नात्याने तरी त्‍या ठिकाणी जाण्‍याची सवय करून घ्‍या.

मागच्‍या वर्षी पुष्‍कळ विद्यार्थी तेथे गेले. तेथील जीवन बघुन ते चकित झाले. ते लोकांना येऊन सांगत होते, आम्‍ही तिथे हे पाहिले, ते पाहिले. हे जोडण्याचे कार्य निरंतर करायचे आहे आणि अरूणजींनी जसे सांगितले, बांग्‍लादेश सीमा-विवादाच्‍या समाप्‍तीनंतर अत्‍यंत महत्‍वाची बाब म्‍हणजे, जी भारताच्‍या हिताचीही आहे, ती ही की, आता ईशान्य भारतातला आपल्‍यासोबत जोडण्‍यासाठी ज्‍या अडचणी येत होत्‍या, त्‍या अडचणीपासून आता मुक्‍तता झाली आहे. भौगोलिकरित्‍या, एक प्रकारे ईशान्य भाग आपल्‍या खूप जवळ आला आहे. नाही तर हा प्रदेश, जो बांग्‍लादेशमध्‍ये असल्‍या कारणाने आपल्‍याशी बांधला गेला नव्‍हता, तो आता सोपा झाला आहे.जसे इथे पायाभूतसरंचनाची बांधणी पूर्ण होईल, तसे याचा लाभ मिळणार आहे.

ईशान्य भारतातील राजधानींच्‍या स्‍थळांना रेल्‍वे व्‍दारे जोडण्‍याचे कार्य जलद गतीने होत आहे. ईशान्य भारत देशाची सेंद्रीय राजधानी बनु शकेल, इतके सामर्थ्‍यवान आहे. तुम्‍ही जगभरातील अननसांचा आस्‍वाद घेतला असेल, परंतु कधी एकदा ईशान्य भारतातल्या अननसांचा आस्‍वाद त्‍या ठिकाणी घेऊन पहा, तुम्‍हाला कळेल की ईश्‍वराने काय दिले आहे, काय दिले आहे.

मी एका गोष्‍टीचा उल्‍लेख करतो………. पहा, आपले जेलियांगजी म्‍हणतात की, तुम्‍ही फक्‍त अननसाचा उललेख का करता? आमच्‍या मिरचीचा उल्‍लेख का नाही करत? खूप कमी लोकांना माहित असेल की, जगात सर्वातजास्‍त तिखट मिरची कोणती असेल, तर ती नागालँडची आहे. हा विविधतेने नटलेला देश आहे. हा प्रदेश आर्थिक विकासाच्‍या क्षेत्रात फार मोठी भूमिका निभवू शकतो. असे नाही की, भारत त्यांचा विकास करेल, मला तर असे दिसते की-त्‍यांचा विकास, हा भारताच्‍या विकासाचे एक कारण बनेल आणि याकरिताच आम्‍ही, ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्‍य देऊन आगेकूच केली आहे. स्‍वातंत्र्यपूर्व काळापासूनच नागालँडमध्‍ये अतिवाद, दहशतवाद, वेगळेपणाची भावनेचा स्‍वर भिनला व त्‍याला शस्‍त्राची जोड मिळाली. प्रत्‍येक सरकारने काही-ना-काही प्रयत्‍न केले. कधी सुधारणा झाल्‍या, कधी व्‍यत्‍यय आला, सुधारणा झाल्‍या, पुन्हा अडचणी आल्‍या-हा क्रम चालत राहिला. प्रत्‍येकाने आप-आपले योगदान दिले आहे. याचे श्रेय एखादया सरकारला जात नाही व त्‍यांचे श्रेय कोणी घेऊ पण नये. प्रत्‍येकाने चांगले करण्‍यासाठी काही-ना-काही योगदान दिलेच आहे आणि याचाच परिणाम म्‍हणून त्‍या लोकासोबत आज नागालँडमध्‍ये यशस्‍वी वाटाघाटी झाल्‍या. मुख्‍य प्रवाहासोबत सामील होउॅन खांदयाला खांदालावून केवळ नागालँडचा नव्‍हे, इशान्यभागाचाच नव्‍हे तर संपूर्ण भारतातचा विकास करण्‍याचे स्‍वप्‍न बघितले आहे.

मला विश्‍वास आहे की, ही एकत्र वाटचाल जो उत्‍तमपणे साध्‍य होईल आणि देश नव्‍या शिखरांना गवसणी घालेल. आज येथे बसलेल्‍या लोकांना अंदाज नसेल की, राणी मॉं च्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ बनवलेले हे नाणे-याचे ईशान्य भारतातल्या घरांत काय सात्विक मूल्‍य असेल ?

त्‍यांना, हे एका पवित्र घटनेच्‍या रूपाने हे बघायला मिळाले, की किती मोठे प्रेरक व्‍यक्तिमत्‍व त्‍या राहल्‍या आहेत. सरकारसाठी ही खरोखरच आनंदाची बाब आहे की, या महान व्‍यक्‍तींना आपले जीवन वर्तमानाशी जोडण्‍यामध्‍ये यश येत आहे आणि भविष्‍यातील जडण –घडणी करीता त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाव्‍दारे सदैव प्रेरणा मिळत राहील, ताकद मिळत राहील. हया सदिच्‍छांसह मी पुन्हा एकदा राणी मॉं यांच्‍या चरणी वंदन करतो. त्‍यांचा आशिर्वाद कायम राहो आणि आपण सर्व मिळून राणी मॉ यांच्‍या ‘देश समृद्ध व्‍हावा, देश एक व्‍हावा, देश अखंड व्‍हावा’ या स्‍वप्‍नाची पूर्तता करण्‍यासाठी कोणती कमतरता भासू देऊ नये. या कल्‍पनेसोबत, खुप खूप शुभेच्‍छा!

D.Wankhede/N.Sapre