Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 च्या टेबल टेनिस पदक विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 च्या टेबल टेनिस पदक विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 च्या टेबल टेनिस पदक विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 मधील टेबल टेनिसमधील पदक विजेत्यांशी संवाद साधला. या खेळाडूंनी नवी दिल्लीत संसद भवनात पंतप्रधानांची भेट घेतली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी बजावलेल्या या पदक विजेत्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. त्यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे, असे ते म्हणाले.

भारतातील छोट्या शहरांमधून क्रीडा गुणवत्ता पुढे येत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच सातत्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या गरजेवर भर दिला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी उपस्थित होते.

B.Gokhale/S.Kane/P.Kor