Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडो प्रकारात महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अस्मिता डे हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


 

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळ 2026 मध्ये महिलांच्या 48 किलो ज्युडो च्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्मिता डे हिचे अभिनंदन केले आहे.

अस्मिताची ही कामगिरी कायम स्मरणात राहील, आणि यामुळे ज्युदो हा खेळ अधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

मोदी यांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छाही दिल्या.

 ‘X’ वरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात, 

“खरोखरच सुवर्णमय कामगिरी! ‘राष्ट्रकुल खेळ 2026’ मधील ज्युडोच्या महिला 48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अस्मिता डे चा अभिमान वाटतो! तिची ही कामगिरी कायम स्मरणात राहील आणि ज्युडो हा खेळ अधिक लोकप्रिय बनवण्यात योगदान देईल. तिच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

#CWG2026*

***

यश राणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai