Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती भवनातील अभ्यागतांच्या परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रपती भवनात, अभ्यागतांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. “इंप्रींट इंडिया” या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून पहिली प्रत राष्ट्रपतींना देतील. “इंप्रींट इंडिया” हा आय.आय.टी. आणि इंडियन इन्स्टियूट ऑफ सायन्स यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत भारताशी संबंधित दहा तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आराखडा विकसित करण्यात येणार आहे.

सुवर्ण मुद्रीकरण योजना, सार्वभौम सुवर्ण रोखे आणि सुवर्ण नाणी या सोन्याशी निगडीत तीन योजनांचा शुभारंभ 7, रेसकोर्स रोड येथे पंतप्रधानांच्या हस्ते एका कार्यक्रमात होईल.

हरियाणातल्या सोनपत येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान, तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजनही करतील. तसेच ते एका जनसभेला संबोधितही करतील.

J.Patnakar/S.Tupe