Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती भवनातील अभ्यागतांच्या परिषदेत “इम्प्रिंट इंडिया” माहिती पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनातील अभ्यागतांच्या परिषदेत “इम्प्रिंट इंडिया” माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले. “इम्प्रिंट इंडिया” हा आयआयटी आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्सचा संयुक्त उपक्रम आहे, या उपक्रमाअंतर्गत भारताशी संबंधित दहा तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आराखडा विकसित करण्यात येणार आहे.

देशाच्या प्रगती आणि विकासासाठी शोध आणि तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रातील शोधांना प्राधान्य दिले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक हवामानाबदल आणि टाकाऊ पदार्थांचे रुपांतर संपत्तीत करणे, यासारख्या आव्हानांवर तोडगा काढणे ही भारताच्या विकासाची गुरुकिल्ली असेल असे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी संरक्षणविषयक उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन त्यांनी केले. विज्ञान हे जागतिक असले तरी तंत्रज्ञान हे स्थानिकच असले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील भागीदारी वृध्दींगत व्हावी असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती हे ज्ञानसागर असल्याचे सांगून उच्चशिक्षण क्षेत्राप्रती त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधानांनी गौरवोद्‌गार काढले.

J.Patnakar/S.Tupe