Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय छात्र सेना आणि टॅब्लो कलाकारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


 

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आलेल्या राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएसचे छात्र, आदिवासी अतिथी आणि टॅब्लो कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

तीन मूर्ती इथे एनसीसी छात्रांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी भारताच्या विविधतेविषयी बोलण्याबरोबरच युवक, देशात परिवर्तन घडवून आणू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. एकमेकांकडून शिकण्यासारखे खूप असते, असे सांगुन आपल्या भोवतालचे बदल स्वीकारणे महत्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

देशाच्या सशस्त्र दलाचा देशाला अभिमान आहे. देशाची सेवा करणाऱ्या शुरवीरांविषयी अधिक जाणून घ्यायला हवे.

देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे अनेक पोलीस आहेत, त्यांच्या बलिदानाविषयी जाणुन घेणे महत्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वच्छतेचे महत्वही पंतप्रधानांनी विषद केले. महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात 10 देशांचे नेते सहभागी होणार असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane