Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य


एन सी सी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी आपले जीवन राष्ट्र आणि जनतेच्या कल्याणाप्रती वाहून घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्यात ते छात्रांना संबोधित करत होते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठीच्या दिल्लीतल्या सुमारे महिन्याभराच्या वास्तव्यात या छात्रांनी पाहिलेल्या चांगल्या गोष्टी आपल्यात बिंबवाव्यात तसंच या छात्रांनी आपल्या गावात, शहरात गेल्यानंतर स्वच्छता, देशभक्ती या मूल्यांचा प्रसारही करावा, असं पंतप्रधान म्हणाले. एनसीसी ही देशभरातल्या युवकांना जोडणारी संस्था आहे आणि देशाच्या ऐक्याप्रती या संस्थेचं योगदान आहे, असं त्यांनी सांगितले.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीची छाप या प्रजासत्ताक दिन सोहळ्यावर होती, असा उल्लेख करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक खडतर प्रसंगांवर मात केली. त्यांच्या मंथनातून राज्य घटनारुपी अमृत त्यांनी निर्माण केले. ही राज्य घटना अनेक दशकांनंतरही आपल्याला खांद्याला खांदा भिडवून चालण्यासाठी मदत करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

N. Chitale / I. Jhala / M. Desai