पीएम्इंडिया
मतिमंदत्व, सेरेब्रल प्लासी, बहुविध अपंगत्व यासंदर्भातल्या राष्ट्रीय न्यासाच्या कलम 4(1) आणि कलम 5(1) मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय न्यासाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल तीन वर्ष निश्चित करण्यासाठी ही सुधारणा करण्यात येत आहे.
राष्ट्रीय न्यास कायदा 1999 च्या कलम 4 (1) मधल्या तरतुदीनुसार या न्यासाचे अध्यक्ष किवा सदस्य,त्यांचे उत्तराधिकारी नेमले जाईपर्यंत, निर्धारित तीन वर्षाच्या काळानंतरही पदावर राहू शकतात. अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास, सरकारकडून उत्तराधीकारी नेमला जाईपर्यंत या पदावर राहण्याची तरतूद कलम 5(1) मध्ये आहे. त्यामुळे पात्र उत्तराधिकारी नसल्यामुळे न्यासाच्या अध्यक्षपदी अनिश्चित काळासाठी व्यक्ती राहू शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आणि एकाच पदावर व्यक्ती प्रदीर्घ काळ राहू नये यासाठी या मध्ये सुधारणा करण्यात येत आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha