Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरणाला मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरणाला मंजूरी देण्यात आली. 2025 पर्यंत भांडवली वस्तूंचे उत्पादन 7,50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे स्पष्ट उद्दिष्ट भांडवली वस्तू क्षेत्रातल्या या पहिल्या धोरणात ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारातही सध्याच्या 8.4 दशलक्ष वरुन 2025 पर्यंत 30 दशलक्षपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

निर्यातीत उत्पादनाच्या सध्याच्या 27 टक्क्यावरुन 40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भांडवली वस्तुंसाठी जागतिक दर्जाचे हब म्हणून भारत ओळखला जावा या दृष्टीकोनाला या भांडवली वस्तू धोरणामुळे मदत होणार आहे. मेक इन इंडिया अभियानाला बळकटी देण्यातही या धोरणाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. उदयोग, विविध मंत्रालयातल्या संबंधितांशी व्यापक चर्चा केल्यानंतरच या धोरणाला अंतिम रुप देण्यात आले.

N.Chitale/B.Gokhale