पीएम्इंडिया
रिओडी जानेरो येथे होणाऱ्या आगामी ऑलिंपिक क्रीडा सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रीडा पटूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भेट घेणार आहेत.
रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या 13 क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी भारतामधून शंभरपेक्षा जास्त क्रीडापटूंची चमू पात्र ठरली आहे. नवी दिल्लीतील माणेकशॉ केंद्रामध्ये आयोजित एका कार्यक्रमात या क्रीडापटूंशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत.
जागतिक पातळीवर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला एका प्रकारची प्रतिष्ठा आहे. या स्पर्धेमध्ये आपल्यातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन क्रीडापटूंनी दाखवावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन क्रीडापटूंशी औपचारिक बातचीत पंतप्रधान करणार आहेत.
S.Bedekar/Bhavna Gokhale