Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ ऑलिंपिकला जाणाऱ्या भारतीय क्रीडा चमूची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भेट

रिओ ऑलिंपिकला जाणाऱ्या भारतीय क्रीडा चमूची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भेट


रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडा चमूची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. यावेळी 60 पेक्षा अधिक खेळाडू उपस्थित होते. खेळाडूंशी अनौपचारिक बातचीत करुन पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा दिल्या.

ऑलिंपिक स्पर्धेला जागतिक स्तरावर असलेली प्रतिष्ठा लक्षात घेऊन खेळाडूंनी आपल्यातील सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला मेरी कॉम, अंजू बॉबी जॉर्ज आणि पी. गोपीचंद यांच्यासह अनेक नामवंत क्रीडापटू उपस्थित होते.

रिओ ऑलिंपिकमध्ये वेगवेगळ्या 13 क्रीडा प्रकारांमध्ये 100 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला युवा आणि क्रीडा खात्याचे केंद्रीय राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह ही उपस्थित होते.

S.Bedekar/Bhavna Gokhale