Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रौप्यपदक पटकावणाऱ्या योगेश कथुनिया या खेळाडूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2024

 

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज पुरुषांच्या थाळी फेक F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल क्रीडापटू योगेश कथुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी  कथुनिया याच्या जिद्द, कठोर परिश्रम आणि लवचिकता या गुणांचे  कौतुक केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“#Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या थाळी फेक F56 मध्ये रौप्य पदक जिंकून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी  करणाऱ्या @YogeshKathuniya याचे अभिनंदन! हे यश त्याचा दृढ निश्चय, कठोर परिश्रम आणि लवचिकतेच्या अविश्वसनीय प्रवासाचे फलित आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. #Cheer4Bharat.”

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai