Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लेह येथील ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाच्या’ उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद


नवी दिल्‍ली, 2 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल लेह येथे ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाचे’ उद्घाटन करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

कपिलवस्तू येथील पिपरहवा स्तूपाशी संबंधित असलेले आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांमध्ये उत्खनन करून मिळालेले हे पूजनीय अवशेष, भगवान बुद्धांच्या चिरस्थायी शिकवणीचे प्रतीक आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

हे प्रदर्शन 14 मे पर्यंत सुरु राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी झंस्कार येथेही हे अवशेष पाठवण्यात येतील, असे नमूद करुन करत  मोदी म्हणाले की, यामुळे लडाखमधील लोकांनाही आदरांजली वाहण्याची एक अमूल्य संधी मिळेल. यामुळे लडाखमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“काल, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, लेह येथे ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाचे’ उद्घाटन करण्यात आले ही अत्यंत समाधानाची बाब आहे. हे पूजनीय अवशेष कपिलवस्तू येथील पिपरहवा स्तूपाशी संबंधित असून, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांत ते उत्खनन करून मिळवण्यात आले होते. हे अवशेष भगवान बुद्धांच्या चिरस्थायी शिकवणीचे प्रकट रुप आहे.”

हे प्रदर्शन 14 मे पर्यंत सुरु राहील  आणि त्यानंतर काही दिवसांनी झंस्कार येथेही  हे अवशेष पाठवण्यात येतील असे नमूद करुन करत  मोदी म्हणाले की, यामुळे लडाखमधील लोकांनाही आदरांजली वाहण्याची एक अमूल्य संधी मिळेल. यामुळे लडाखमधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळेल,”

* * *

सुषमा काणे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai