पीएम्इंडिया
भारतरत्न लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त उद्या नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित लोकतंत्र प्रहरी अभिनंदन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान उद्या मुंबईला भेट देणार आहेत. या भेटी दरम्यान पंतप्रधान चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर इंदू मील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमीपूनजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचे तसेच दोन मेट्रो कॉरिडॉरचे भूमीपूजन पंतप्रधान करणार आहेत. त्यानंतर मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात एका जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित करतील.
Going to Mumbai, where I will join various programmes. http://t.co/SEgoLO0LE0
— NarendraModi(@narendramodi) October 11, 2015