Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय आणि पोर्तुगालच्या प्रशासकीय आधुनिकीकरण मंत्रालय यांच्यातील लोक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
लोक सेवा व्यवस्थापन क्षेत्रातील बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने पोर्तुगालमधील ग्राहकाभिमुख लोक सेवा यंत्रणा समजून घेण्यास या करारामुळे मदत होईल. भारतातील लोक सेवा यंत्रणा सुधारण्यासाठीही त्यांच्या सर्वोत्तम अभिनव पद्धती स्वीकारणे शक्य होईल.

लोक प्रशासन आणि शासन सुधारणा संबंधी संयुक्त कृती गटावर या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल.

B.Gokhale/S.Kane/Anagha