पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या गावांच्या सरपंचाचे नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. पंतप्रधानांची भेट घेणारा हा चौथा गट आहे.
शाळेमध्ये मुलांची उपस्थिती आणि माध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिने सरपंचांनी काम करावे यासाठी पंतप्रधानांनी यावेळी सरपंचांना प्रोत्साहन दिले. सर्वांनी आपल्या गावात स्वच्छता राखावी यासाठी देखील त्यांनी सर्वांना प्रोत्साहित केले.
मुलगा आणि मुली मध्ये कोणताही भेदभाव करु नये, अशी विनंती पंतप्रधानांनी यावेळी केली.
B.Gokhale/S. Tupe/ D. Rane