Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी विधानसभा मतदार संघातील गावांच्या सरपंचासोबत पंतप्रधानांची चर्च


पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज, वाराणसी विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या गावांच्या सरपंचाचे नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले.

चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी सरपंचानी आपल्‍या संबंधित गावांमध्ये संपूर्ण लसीकरण, शून्य शाळा गळती आणि स्वच्छता या सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.

पंतप्रधानांनी यावेळी तेथे उपस्थित गटांना विनंती केली की, त्यांनी मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करु नये. मुलीचा जन्म झाल्यानंतर झाड लावून तो साजरा करण्याची इच्छा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

सरपंच संसद भवन आणि दिल्ली शहराच्या त्यांच्या यात्रेतील अनुभव वाराणसीला त्यांच्या गावी जाऊन सर्वांना सांगावेत असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.

BG/SM/AK