Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विक्रम-1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचे केले अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्कायरूट एरोस्पेसच्या चमूशी संवाद साधला आणि विक्रम-1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वाटचालीतील हा एक महत्त्वाचा आणि दिशादर्शक क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अंतराळ क्षेत्रात आपल्या खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारे खुली करत असून नवोन्मेषाला गती देत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 

हे यश असंख्य युवांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि धाडसाने नवोन्मेषाची कास धरण्यासाठी प्रेरित करेल असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :

स्कायरूट एरोस्पेसच्या चमूशी संवाद साधला आणि विक्रम-1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वाटचालीतील हा एक महत्त्वाचा आणि दिशादर्शक क्षण आहे. आपल्या खाजगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारे खुली करत असून नवोन्मेषाला गती देत आहे.
हे यश असंख्य युवांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि धाडसाने नवोन्मेषाची कास धरण्यासाठी प्रेरित करेल.

@SkyrootA

***

राधिका अघोर/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]