Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता यामध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाला माहित


भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, तंत्रज्ञान विकास मंडळ आणि फ्रान्समधली सार्वजनिक गुंतवणूक बँक यांच्यात सहकार्याविषयी झालेल्या सामंजस्य कराराबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता या क्षेत्रात भारत आणि फ्रान्स मधल्या कंपन्या, संस्थांमध्ये तंत्रज्ञानविषयक देवाणघेवाण जलद व्हावी यासाठी समन्वित उपाययोजना आणि उत्तम प्रथांचे आदानप्रदान या सामंजस्य करारामुळे सुलभ होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar