Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विविध पूरग्रस्त राज्यांना मदत आणि दिलासा कार्यात संपूर्ण सहाय्य देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन


उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या पूरग्रस्त राज्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी संपूर्ण सहाय्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. सर्व पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेची प्रार्थना करत या प्रभावित भागांमधील स्थिती लवकरात लवकर पूर्ववत होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

“उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील पूरप्रभावित भागांमधल्या लोकांच्या सुरक्षेसाठी आणि ते सुखरुप असावेत यासाठी मी प्रार्थना करतो. गृहमंत्री राजनाथ सिंग संपूर्ण परिस्थितीवर जवळून लक्ष ठेवून आहेत. त्यांनी संबंधित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून, तेथील मदत आणि दिलासा कार्याची माहिती घेतली आहे. या मदत आणि दिलासा कार्यासाठी केंद्र पूर्णपणे सहाय्य करेल, या पूरग्रस्त भागांमधील परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होईल, अशी आशा मला वाटते” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

BG/MP/VD