Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्यापार सुलभीकरण कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार सुलभीकरण करार(टीएफए) अंतर्गत वचनबध्दतेच्या अधिसूचनेसाठी प्रस्ताव, जागतिक व्यापार संघटनेच्या सचिवालयात टीएफएच्या नियमांच्या स्विकृती पत्राला मंजूरी आणि राष्ट्रीय व्यापार सुविधा समितीच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे.

व्यापार सुलभीकरण करारामध्ये मालाची वाहतूक आणि मान्यता देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये निर्यात वस्तूंचाही समावेश आहे. व्यापार सुलभीकरणासाठी सीमा शुल्क विभाग आणि इतर प्राधिकरणादरम्यान कार्यक्षम सहकार्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

जागतिक व्यापार संघटनेच्या दोन तृतीयांश सदस्यांकडून मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत सदस्यांसाठी व्यापार सुलभीकरण करार लागू केला जाईल.

करारामधील प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी आणि देशांतर्गत समन्वय साधण्यासाठी महसूल विभागाचे सचिव आणि वाणिज्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका राष्ट्रीय व्यापार सुविधा समितीची स्थापना करण्यात आली आहे.

S.Mhatre/S,Tupe/M.Desai