Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शांतता, समृध्दी आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्यासाठीच्या प्रार्थनांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक


 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज शांतता, कल्याण आणि निसर्गाशी सुसंवादासाठीच्या प्रार्थना अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित  सामायिक  केले.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे;

“शं नो वातः पवतां शं नस्तपतु सूर्यः।

शं नः कनिक्रदद् देवः पर्जन्योऽभिवर्षतु॥”

शांती, आरोग्यदायी वातावरण तसेच निर्मलता पसरवणाऱ्या रीतीने वायु आमच्यासाठी वाहत राहो. समृध्दी आणि आशीर्वादाचा स्रोत म्हणून सूर्यदेव आमच्यावर तळपत राहो. त्याच्या जिव्हाळ्याची ऊब आणि प्रकाश आम्हाला सुख आणि आनंद देत राहो आणि दिव्य पर्जन्यदेव आमच्यावर जीवनदायी आणि पवित्र जलवर्षाव करत राहो.

***

नेहा कुलकर्णीी/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai