पीएम्इंडिया
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा,
महासचिव बान की मून
महोदय,
दुसऱ्या महायुध्दाच्या रणभूमीवरच्या शूर सैनिकांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा पाया घातला. 1945 पर्यंत त्यात भारतीय सैन्यातल्या 2.5 दशलक्ष जवानांचा समावेश करण्यात आला. 24000 पेक्षा जास्त जणांनी आपले प्राण गमावले तर निम्मे जण बेपत्ता झाले. या बलिदानाचा वारसा असणारे तीन देश इथे उपस्थित आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती अभियानात सध्या त्यांचं मोठं योगदान आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती अभियानात 1,80,000 पेक्षा जास्त भारतीय सैनिक सहभागी झाले आहेत. इतर कोणत्याही देशापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या 69 शांती मोहीमांपैकी भारत 48 मोहीमात सहभागी झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या कार्यात 161 भारतीय शांती सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिलं आहं.
लायबेरियात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहीमेदरम्यान महिला स्थापित पोलीस युनिट पाठविणारा भारत हा पहिला देश होता. अनेक देशातल्या शांतीकार्य अधिकाऱ्यांना भारत प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत 82 देशातल्या सुमारे 800 अधिकाऱ्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं आहे.
शांती कार्याविषयीच्या या परिषदेचं यजमानपद भूषविल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानतो. या संस्थेच्या केवळ 70 व्या वर्धापनदिनामुळे ही वेळ योग्य आहे असं नव्हे तर सुरक्षाविषयक बदलत्या वातावरणामुळेही ही वेळ योग्य ठरत आहे. शांतीदलाची मागणी वाढत आहे आणि संसाधन मिळवणं कठीण होत चाललं आहे.
सध्या केवळ शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी शांतीरक्षकांना बोलावलं जात नाही तर परिषदे नाही तर जटील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीही बोलावलं जातं.
आदेश महत्वाकांक्षी असतात मात्र संसाधन बहुदा नेहमीच अपुरी असतात. आदेश कधीकधी शांती रक्षकांसाठी संघर्ष करणारा पक्ष बनू शकतो ज्यात त्यांचं जीवन आणि मोहिमेचं यश धोक्यात येऊ शकतं.
शांती सैन्यात सहभागी होणाऱ्या देशांना, निर्णय घेणा-या प्रक्रियेत स्थान नसतं त्यामुळे मोठया प्रमाणात प्रश्न निर्माण होतो.
विवेक राखत, मर्यादांची जाणीव ठेवत राजकीय उपायांना पाठबळ म्हणून शांती रक्षक तैनात करायला हवेत. शांतीकार्याविषयीच्या उच्च स्तरीय स्वतंत्र पॅनेलनं या मुद्याची दखल घेतली हे निश्चितच प्रशंसनीय आहे. या पॅनेलच्या शिफारसींवर तातडीनं अहवाल दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे आभार. त्यावर लवकरच विचारविनिमय होईल अशी अपेक्षा आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती अभियानाप्रती भारताची दृढ कटिबध्दता आहे आणि ती वृध्दींगत होत राहील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहीमेत आमच्या आणखी योगदानाचा इरादा नुकताच जाहीर केला आहे.
सध्याच्या किंवा नव्या मोहीमेत 850 सैनिकांची अतिरिक्त तुकडी महिला शांतीरक्षकांची मोठी संख्या असलेल्या 3 अतिरिक्त पोलीस तुकडया, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहीमेत तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सैन्याचं यश त्यांना दिल्या जाणाऱ्या शस्त्रांवर नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघ परिषदेच्या निर्णयाच्या नैतीक बळावर अवलंबून असते.
संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रभाव कायम राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या सुधारणा आपण कालबध्द रीतीनं पूर्ण केल्या पाहिजेत.
संयुक्त राष्ट्रसंघाची उच्च विचारधारा राखण्यासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या सैनिकांना माझी श्रध्दांजली. या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात येणारी भिंत लवकरात लवकर निर्माण केल्यास ते सयुक्तीक ठरेल. यासाठी भारत आर्थिक तसंच इतर योगदान द्यायलाही तयार आहे.
N. Chitale/S.Tupe
I thank President Obama for hosting this summit on peacekeeping: PM makes his remarks at the USA hosted summit https://t.co/nCzLbKMrYu
— PMO India (@PMOIndia) September 28, 2015
India's commitment to peacekeeping remains strong and will grow: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 28, 2015
I pay homage to peacekeepers who laid down their lives defending the ideals of the UN: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 28, 2015
At the Summit of Peace Operations, talked about India's rich contribution towards @UN peacekeeping missions. http://t.co/zduOiPxO8U
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2015
I pay homage to all those brave peacekeepers who laid down their lives for ideals of the @UN & to make our world a better place.
— NarendraModi(@narendramodi) September 28, 2015