Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शासकीय कर्मचाऱ्यांनी “बदलाचे दूत” व्हावे- पंतप्रधानांचे आवाहन

शासकीय कर्मचाऱ्यांनी “बदलाचे दूत” व्हावे- पंतप्रधानांचे आवाहन

शासकीय कर्मचाऱ्यांनी “बदलाचे दूत” व्हावे- पंतप्रधानांचे आवाहन


शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या संबंधित संगठना आणि विभागांमध्ये “बदलाचे दूत” व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी शासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 21 व्या शतकात शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा सुनिश्चित करावी, नियंत्रण नियमन आणि व्यवस्थापकीय क्षमतांच्या पलीकडे जाऊन आपण बदलाचे दूत आहोत असा विचार करावा असे पंतप्रधानांनी सांगितले.

शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले गट निर्माण करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “परिवर्तनापासून सुधारणेपर्यंत” हा आपला मंत्र कर्मचाऱ्यांनी “परिवर्तनापासून कार्यान्वयनापासून सुधारणेपर्यंत” अशा आशयाने स्वीकारावा. शासकीय कर्मचारी कार्यान्वयना प्रति सक्षम झाले तर सुधारणांच्या पुराव्यावरुन ते सिद्ध होईल असे पंतप्रधान म्हणाले.

आज ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांनी घेतलेल्या पुढाकारातून “ जन भागीदारी” ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी जनतेशी अधिकाअधिक संवाद साधावा जेणेकरुन निम्न स्तरापर्यंत शासकीय योजना आणि उपक्रमांची अधिक चांगली अंमलबजावणी होऊ शकेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

“नागरी सेवा दिवस” हा पुनरावलोकन करण्याचा आणि आजवरच्या प्रवासाचे समीक्षात्मक मूल्यांकन करण्याचा दिवस असून नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी उद्युक्त करणारा ठरावा असे पंतप्रधान म्हणाले.

यशस्वी उपक्रम राबवणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांचे यश इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. या वर्षी पुरस्कार निश्चितीसाठी एकूण 74 यशोगाथा विचारात घेतल्या गेल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत वाढ झाली आहे असे निरिक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. या आकडेवारीत देशातील केवळ 10 जिल्हे समाविष्ट आहेत असे सांगत इतर जिल्ह्यांनीही या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे असे आवाहन त्यांनी केले.

जनहिताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवनवीन मार्ग विचारात घेत शासकीय कर्मचाऱ्यांनी धाडसी प्रयोग करावेत अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

प्रशासनाच्या मुख्य भागांमधील उपक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या सचिव समितीच्या पार्श्वभूमीवर समितीचे कार्य विचारात घेत अधिकाऱ्यांनी या आघाडीवर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा स्वेच्छेने काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्ता केले. या गटांनी रुळलेल्या वाटा सोडून नव्या कल्पना आणि सूचना यशस्वीपणे समोर आणल्या. या कामासाठी त्यांनी “10 हजार मानवी कामकाजाचे तास” इतका वेळ काम केले अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

M.Pange / B. Gokhale