Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शिलॉग येथे एका सार्वजनिक सभेला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण

शिलॉग येथे एका सार्वजनिक सभेला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण

शिलॉग येथे एका सार्वजनिक सभेला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण


येथे मंचावर येण्यापूर्वी मी स्वावलंबी बचतगटांच्या महिलांनी मांडलेल्या स्टॉल्सच्या प्रदर्शनात फेरफटका मारला. या प्रदर्शनात ईशान्येकडील सर्व आठ राज्यांमधल्या महिला सहभागी झाल्या आहेत. प्रदर्शनात मांडलेल्या सर्व कलाकृती आणि उत्पादने खरोखरच आकर्षक आणि प्रभावी होती. आज येथे उपस्थित असलेल्या स्वावलंबी बचतगटांच्या सर्व महिलांचे मी अभिनंदन करतो. मला त्यांच्यातली प्रतिभा दिसते आहे

या स्वावलंबी बचत गटांना दीन दयाळ अंत्योदय योजनेतून प्रोत्साहन मिळाले आहे. हे स्वावलंबी बचत गट मोठ्या संख्येने ईशान्य विकास वित्तीय संस्थेकडून कर्ज सुविधेचा लाभ घेत आहेत. यात ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या व्याज सवलती सुद्धा व्याज घटकांच्या स्वरूपात समाविष्ट आहेत.

स्वावलंबी बचत गट, विशेषत: महिलांच्या स्वावलंबी बचत गटांच्या विकासाप्रती केंद्र सरकार वचनबद्ध आहे. हे लक्षात घेता, डिसेंबर 2015 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने ईशान्येकडील राज्यांसाठी एका विशेष पॅकेजला मंजुरी दिली होती. 2023-24 पर्यंत ईशान्येकडील राज्यांमधील दोन तृतीयांश ग्रामीण कुटुंबाना सामावून घेण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मोहिमेच्या कार्याला वेग देणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

मित्रांनो…

आज मी एका फुटबॉल स्टेडियमसाठीच्या पायाभरणी समारंभातही सहभागी झालो. ईशान्येकडच्या, विशेषत: मेघालयच्या नागरिकांना फुटबॉल या खेळाबद्दल वाटणारी आपुलकी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या भागात फुटबॉल हे एक वेड आहे आणि हा खेळ इथल्या काना-कोपऱ्यात खेळला जातो. यूगेनसन लिंगदोह, ऐबोर खोंगजी आणि मारलंग्की सूटिंग या आणि अशा सर्व फुटबॉलपटूंबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि भारतीय सुपर लीग मध्ये आपापल्या क्रीडा क्लबस्‌साठी खेळून आपल्या देशाची आणि राज्याचीही मान अभिमानाने उंचावली आहे.

मला असे सांगण्यात आले की, तळागाळातल्या फुटबॉलपटूंचे कौशल्य प्रकाशात आणणे आणि त्यांच्या खेळात सुधारणा घडवून आणणे, तसेच बालके आणि युवकांना व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या रूपात जगासमोर आणणे, हा सरकारच्या मेघालय फुटबॉल मोहिमेचा उद्देश आहे. ईशान्य विकास मंत्रालयाच्या वतीने ३८ कोटी रूपये खर्चून बांधल्या जणाऱ्या या फुटबॉल स्टेडियममुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यास सहाय्य मिळेल, असा मला विश्वास वाटतो.

पुढच्या वर्षी २०१७ साली भारत १७ वर्षे वयोगटाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. भारतात होणाऱ्या या कार्यक्रमाचा आपण लाभ घेतला पाहिजे. केवळ ईशान्यच नाही तर देशाच्या इतर भागांतही या खेळाचा प्रचार आणि विकास सुनिश्चित करणे गरजेचे आहे, असे वाटते.

मेघालयात मोठ्या संख्येने फुटबॉल क्लब आणि संघटना आहेत. पण आपण स्वत:सुद्धा स्थानिक स्तरावर स्पर्धेचे आयोजन करू शकता आणि या स्पर्धांची व्याप्ती देशाच्या इतर भागांपर्यंतही वाढविता येईल. १७ वर्षे वयोगटाखालील विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने हे महत्वाचे ठरेल.

मित्रांनो,

आपणा सर्वांना माहिती आहे की, जगभरात सर्वात जास्त पाऊस भारतात चेरापूंजी येथे पडतो. आज त्यामुळे आणखी एक अनोखी बाब साध्य झाली आहे. चेरापूंजीचे डॉपलर वेदर रडार आज देशाला अर्पण करण्यात आले. चेरापूंजी येथे ऊभारण्यात आलेल्या या रडारच्या यशाबद्दल मी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारतीय हवामान विभागाचे त्रिवार अभिनंदन करतो.

सौंदर्य आणि रोमांच यांचे मिलन असणाऱ्या या क्षेत्राला मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे असंख्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे.
या हवामान रडार प्रणालीमुळे विशेषत: ईशान्य क्षेत्रासाठी हवामानासंबंधी अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. तसेच वाईट हवामानामुळे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठीही ही प्रणाली सहायक ठरणार आहे.

आज मला ईशान्य परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्याची तसेच या क्षेत्रातील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने मला ईशान्य भारतातील विकास कार्यक्रमांची झलक पाहता आली. येथे खूप चांगले काम केले जात आहे. मात्र तरीही अजून बरेच काम करायची आवश्यकता आहे.

माझ्या सरकारने पूर्व कृती धोरणावर काम केले आहे. मी ईशान्य क्षेत्राला दक्षिण पूर्व आशियाचे प्रवेशद्वार मानतो. या धोरणांतर्गत या क्षेत्रात रस्ते, रेल्वे, दूरसंवाद, वीज आणि जलमार्गासह पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. आज या मोहिमेअंतर्गत मी तीन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. देशाच्या रेल्वे जाळ्याने ईशान्येकडील राज्ये जोडण्याप्रती आम्ही वचनबद्ध आहोत. केंद्रात रालोआ सरकारच्या स्थापनेनंतर आम्ही ईशान्य भागात रेल्वे जाळे उभारण्यासाठी १० हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. या वर्षी ५ हजार कोटी रूपये खर्च करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे.

नोव्हेंबर, 2014 मध्ये मेघालय आणि अरुणाचल प्रदेश ही राज्ये भारताच्या रेल्‍वे नकाशावर आली आहेत. नुकतेच त्रिपुरामधील आगरतळा भागाला ब्रॉड गेज रेल्‍वे लाइनद्वारे जोडले गेले. ब्रॉड गेज रेल्वेच्या प्रवासी रेल्वेगाड्यांद्वारे आता मणीपूर आणि मिझोराम सारखी राज्येही जोडली गेली. आजघडीला जम्मूजवळ कटरा येथे वैष्णों देवीसह गुवाहाटीमध्ये कामाख्याशी सरळ जोडली गेली आहे.

आपण आपल्या शेजारी देशांसाठी रस्ते आणि रेल्वेमार्ग खुले करीत आहोत. यामुळे या क्षेत्राला आर्थिक गती प्राप्त होईल.

केंद्र सरकारने जुलै 2014 मध्ये ईशान्य भागात महामार्गांच्या विकासासाठी एक विशेष महामंडळ राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळांची स्थापना केली आहे. हे महामंडळ ब्रम्हपुत्रा नदीवर तीन नवीन पूल बांधत आहे. ते ईशान्य भागात 34 रस्ते प्रकल्पांची अंमलबजावणी करत आहे, ज्याद्वारे 10 हजार कोटी रुपये खर्चातून 1 हजार किलोमीटर रस्ते बांधले जात आहेत. ईशान्य रस्ते क्षेत्र विकास योजना सुरु करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश या क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्याला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणे हा आहे.

विकासाद्वारे देशांतर्गत जलमार्ग विकासाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने ईशान्य भागात 19 जलमार्गांचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकास करण्याची घोषणा केली आहे.

लोकांना 24 तास वीज उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार वीज क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. सर्व आठ ईशान्य राज्यांमध्ये वीज पारेषणात सुधारणा करण्यासाठी दोन प्रकल्पांवर काम सुरु आहे, ज्यावर 10 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

विश्वनाथ-चरियाली ते आग्रा पारेषण नेटवर्कच्या स्थापनेमुळे या क्षेत्राला अतिरिक्त 500 मेगावॅटचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल. देशातील विद्युतीकरण न झालेल्या 18 हजार गावांपैकी 7 हजार गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. मला आशा आहे की, वर्ष 2018 पर्यंत ईशान्येसह देशातील कोणतेही गाव वीजेपासून वंचित राहणार नाही.

सरकार 5 हजार 300 कोटी रुपये खर्चून ईशान्य भागासाठी एक व्यापक दूरसंचार योजना लागू करत आहे. आगरतळा हे बांगलादेशाच्या कॉक्स बाजाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वाराशी जोडणारे देशातील तिसरे शहर बनले आहे. यामुळे दूरसंचार संपर्कामध्ये सुधारणा झाली आहे आणि या क्षेत्राच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.

काही महिन्यांपूर्वी माझ्या गंगटोक दौऱ्यादरम्यान सिक्कीमला देशातील पहिले सेंद्रिय राज्य घोषित करण्यात आले होते. अन्य ईशान्य राज्ये सिक्कीमपासून धडा घेऊ शकतात, जे सेंद्रिय राज्य बनले आहे. खरे तर ईशान्य क्षेत्रामध्ये भारताचे सेंद्रिय फूड बास्केट बनण्याच्या अमाप क्षमता आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

मित्रांनो,

आज कुणालाही छोटे कर्ज घेण्यासाठी बँकेच्या कठोर तपासणीतून जावे लागते. केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे, ज्या अंतर्गत छोट्या व्यापाऱ्यांना गहाण मुक्त कर्ज दिले जाते. 2015-16 दरम्यान 3.48 कोटी व्यापाऱ्यांसाठी 1.37 लाख कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली. यापैकी 6 लाख कर्जे ईशान्य राज्यांमध्ये देण्यात आली, जी 2800 कोटी रुपये इतकी होती.

अशाच प्रकारे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत, या क्षेत्रात 93 लाख खाती उघडण्यात आली. सुमारे 21 लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, नामांकित करण्यात आले. तर सुमारे 19 लाख लोक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत नामांकित करण्यात आले.

कृषीनंतर वस्त्रोद्योग क्षेत्रातून सर्वात जास्त लोकांना रोजगार मिळतो. या क्षेत्रात परिधान विभाग सर्वात जास्त रोजगार देतो. या क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने काम करत आहेत.

ईशान्य क्षेत्र वस्त्रोद्योग प्रोत्साहन योजनेअंतर्गत, औद्योगिक घडामोडी आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी ईशान्येच्या आठही राज्यांमध्ये एक-एक परिधान आणि वस्त्र निर्मिती केंद्र निर्माण केले जात आहे, ज्यासाठी अंदाजे 145 कोटी रुपये खर्च येईल. या आठ केंद्रांपैकी सात केंद्रांचे काम पूर्ण झाले असून, प्रत्येक केंद्रात 3 युनिट्स आहेत.
मित्रांनो,

मेघालयाचा विशिष्ट ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वांशिक वारसा आहे. त्याला नैसर्गिक सौंदर्य आणि वन्य जीवनाचे वरदान मिळाले आहे. असे कोणतेही कारण दिसत नाही की, पर्यटकांना मेघालयाला फिरायला जाण्याची इच्छा नसेल. इथे पर्यटनाच्या अमाप संधी आहेत, विशेषत: मेघालयामध्ये सहासी पर्यटनासाठी पुरेशा संधी आहेत.

आपल्याला पर्यटकांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी पर्यटक सर्किट विकसित करणे गरजेचे आहे, ज्याद्वारे रस्ते संपर्क, हॉटेल्स आणि स्वच्छतेमध्ये सुधारणा केली जाऊ शकेल. केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही नवीन योजना सुरु केली आहे, ज्याअंतर्गत देशभरात पर्यटक सर्किट विकसित केले जात आहेत. असेच एक सर्किट ईशान्यमध्ये प्रस्तावित आहे.

दोन वर्षांपेक्षा कमी काळापूर्वी 2 ऑक्टोबर 2014 रोजी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2016 पर्यंत स्वच्छ भारत बनवण्याची योजना सुरु केली होती, जी राष्ट्रपिता महात्मा गांधींसाठी श्रद्धांजली असेल. एका वर्षातच 15 ऑगस्ट 2014 ते 15 ऑगस्ट 2015 पर्यंत स्वच्द भारत-स्वच्छ विद्यालय कार्यक्रमांतर्गत आम्ही देशातील दोन लाखांहून अधिक शाळांमध्ये 4.17 लाख शौचालये बांधली.

स्वच्छ भारत अभियान ही स्वच्छतेसाठी सुरु करण्यात आलेली एक लोक चळवळ आहे. या चळवळीचा सर्वात जास्त लाभ गरीबातील गरीब लोकांना मिळाला आहे. मी तुम्हा सर्वांना या चळवळीत सक्रिय पणे सहभागी होण्याची विनंती करतो. आणि उघड्यावर शौचापासून मुक्त समाज आणि स्वच्छ पर्यावरण सुनिश्चित करायला हवे.
मी हे पाहून समाधानी आहे की, स्वच्छ भारत अभियानाबरोबर क्षेत्रात आरोग्य आणि स्वच्छतेत वाढ झाली आहे. मेघालयमध्ये मायलयोंग गाव स्वच्छ गाव बनले आहे आणि गंगटोकसह संपूर्ण सिक्कीम राज्यात जास्त पर्यटक येत आहेत.
‘ईशान्य करेल नेतृत्व – स्वच्छ भारत अभियान’ स्पर्धेच्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी मी ईशान्य परिषदेचेही अभिनंदन करतो. गंगटोकची ईशान्येकडील सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाला पात्र आहेत.

शिलाँगमध्ये ईशान्य परिषदेच्या व्यापक बैठकीचे आयोजन केल्याबद्दल मेघालयाच्या जनतेचे अभिनंदन करतो. तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

जय हिंद!

M. Pange / S. Kane / B. Gokhale